पथकात सहभागी होण्याचे आवाहन करणारे संदेश समाजमाध्यमांमध्ये

पुणे : पावसाच्या आगमनाबरोबरच गणेशोत्सवाचेही वेध लागले आहेत. सोबतच ढोलताशा पथकांचे ‘मार्केटिंग’ सुरू झाले आहे. पथकात सहभागी होण्याचे आवाहन करणारे, पथकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करणारे ‘आकर्षक’ संदेश समाजमाध्यमांमध्ये फिरू लागले आहेत. गेले सात-आठ महिने बंद असलेली ‘फेसबुक पेज’ जिवंत होऊ लागली आहेत. तसेच चौकांमध्ये पथकांचे फ्लेक्सही दिसू लागले आहेत.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

दरवर्षी गणेशोत्सवाबरोबरच ढोलताशा पथकांची मोठी चर्चा असते. गणेशोत्सवाच्या दोन-अडीच महिने अगोदरच पथकांच्या ढोलांचा आवाज दणाणू लागतो. दरवर्षी नवनवी पथके तयार होतात, तर काही बंदही होतात. पथकांच्या दीड-दोन महिने आधीपासून सुरू होणाऱ्या सरावामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला कंटाळून नागरिकांच्या पोलिसांकडे तक्रारी जातात. मग पोलिस पथकांसाठी सरावाच्या वेळा ठरवून देतात. त्यावरून बरेच वादविवाद होतात. गेली पाच-सहा वर्षे हा सगळा व्यवहार वेळापत्रकानुसार चालला आहे.

यंदा सप्टेंबरमध्ये असलेल्या गणेशोत्सवाची, ढोलताशा पथकांच्या सरावाची चर्चा जूनमध्येच सुरू झाली. नव्या तरुणांना पथकात सामावून घेण्यासाठी पथके समाजमाध्यमांचा वापर करतात. त्यासाठी पथकाची जाहिरात समाजमाध्यमांतून केली जाते. त्यानुसार येत्या गणेशोत्सवाची तयारीही समाजमाध्यमांतून सुरू झाली आहे.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा समाजमाध्यमांतून पथकात सहभागी होण्याचे आवाहन करणारे संदेश फिरू लागले आहेत. पथकाची लोकप्रियता, पथकाचे सामाजिक काम, पथकाची वैशिष्टय़े, वेगळेपण अशी माहिती या संदेशात देण्यात आली आहे. पुण्यात शिक्षणानिमित्त बाहेरगावचे अनेक विद्यार्थी येतात. त्यांना ढोलताशा पथकांविषयी कुतूहल आणि आकर्षण असते. पथकात सहभागी होण्याच्या या संदेशांना अशा विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. हे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागले आहेत. त्याशिवाय फेसबुकवर असलेल्या पेजवरही पोस्ट लिहिल्या जात आहेत.

गेले सहा-आठ महिने ठप्प असलेली पेजेस या निमित्ताने पुन्हा जागृत होऊ लागली आहेत. त्याशिवाय चौकांमध्ये पथकांचे फ्लेक्सही दिसू लागले आहेत. पथकांच्या या ‘मार्केटिंग’मुळे लवकरच सराव सुरू  होण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत.

यंदा गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये असल्याने ढोलताशा पथकांच्या सरावाबाबत अद्याप काहीही बोलणी झालेली नाहीत. लवकरच त्या बाबत बैठक होईल. समाजमाध्यमांतून फिरणारे संदेश हा त्या पथकांशी संबंधित विषय आहे.

अनूप साठे, सचिव, ढोलताशा पथक महासंघ