News Flash

महापालिकेच्या ठाकरे रुग्णालयात डायलेसिस केंद्र सुरू होणार

कमला नेहरू रुग्णालयात अवघ्या चारशे रुपयांमध्ये डायलेसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Dialysis
प्रतिनिधिक छायाचित्र

गरीब रुग्णांना अल्प दरात उपचार, स्थायी समितीची मान्यता

महापालिकेच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरू करण्यास स्थायी समितीने सोमवारी मान्यता दिली. लायन्स क्बल ऑफ पूना नेत्र प्रतिष्ठानच्या वतीने हे सेंटर चालविण्यात येणार असून त्यांच्या समवेत दहा वर्षांचा करार करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना अल्प दरात डायलेसिसचे उपचार घेता येणार आहेत.

महापालिकेच्या वतीने कमला नेहरू रुग्णालयात अवघ्या चारशे रुपयांमध्ये डायलेसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मित्र मंडळ चौकातील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डायलेसिसचे सेंटर सुरू करण्याचा आणि लायन्स क्लब ऑफ पूना नेत्र प्रतिष्ठान समवेत करार करण्यात यावा, असे पत्र नगरसेवक महेश लडकत आणि योगेश समेळ यांनी स्थायी समिती दिले होते. महापालिका प्रशासनाने त्याबाबत सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे या प्रस्तावाला सोमवारी मान्यता देण्यात आली.

रुग्णालयातील पंधराशे चौरस फूट जागा डायलेसिस सेंटरसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार असून दहा वर्षांचा करार करण्यात आला आहे. शहरी गरीब योजनेचे कार्ड असलेल्या रुग्णांना दोनशे रुपयांमध्ये तर गरीब वर्गातील रुग्णांकडून चारशे रुपये या सुविधेसाठी आकारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापालिकेत रेझिलियंट कक्षाची उभारणी

भौतिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देताना शहरे अधिक लवचिक व्हावीत यासाठी रॉकफेलर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या रेझिलियंट सिटीज या उपक्रमांतर्गत पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका आणि रॉकफेलर फाउंडेशनसमवेत लवकरच करार करण्यात येणार असून त्या अंतर्गत महापालिकेत शंभर रेझिलियंट सिटीज् उपक्रमाचे कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. त्यालाही स्थायी समितीकडून मान्यता देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 1:29 am

Web Title: dialysis center will be started at thackeray municipal hospital in pune
Next Stories
1 वृद्ध रुग्णाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरवर चाकू हल्ला
2 पुण्यात खतनिर्मिती प्रकल्पांवर उधळपट्टी
3 पिंपरी ‘स्मार्ट सिटी’च्या  नियोजनासाठी इस्राइलकडून धडे
Just Now!
X