07 March 2021

News Flash

‘‘डीआयएटी’ने नागरी, व्यावसायिक उपयोगाच्या क्षेत्रातही काम करावे’

‘डीआयएटी’चा आठवा पदवीप्रदान समारंभ मंगळवारी र्पीकर यांच्या उपस्थितीत झाला.

‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अॅoडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’चा (डीआयएटी) आठवा पदवीप्रदान समारंभ मंगळवारी संरक्षणमंत्री व संस्थेचे कुलपती र्पीकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी त्यांनी ‘काँपेंडियम ऑन ग्रांटेड अँड अॅ क्टिव्ह पेटंट्स ऑफ डीआरडीओ २०१६’ या पुस्तिकेचे प्रकाशन केले. या वेळी (डावीकडून) संरक्षण मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. ख्रिस्तोफर, र्पीकर, संस्थेचे कुलगुरू डॉ. एस. पाल उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रिकर यांची अपेक्षा
‘‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’ (डीआयएटी) या तंत्रज्ञान व संशोधन संस्थेने देशाच्या संरक्षणासंबंधीच्या गरजा पूर्ण करून नागरी व व्यावसायिक उपयोगाच्या क्षेत्रातही काम करावे,’’ अशी अपेक्षा केंद्रीय संरक्षणमंत्री व संस्थेचे कुलपती मनोहर र्पीकर यांनी व्यक्त केली.
‘डीआयएटी’चा आठवा पदवीप्रदान समारंभ मंगळवारी र्पीकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते. ‘एम.टेक.’ अभ्यासक्रमाचे ११० विद्यार्थी, ‘एमएस’ अभ्यासक्रमाचे ८ विद्यार्थी आणि ‘पीएच.डी.’च्या २३ विद्यार्थ्यांना र्पीकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली, तर ‘एम.टेक.’च्या १३ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील उत्तम कामगिरीसाठी पदके प्रदान करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. ख्रिस्तोफर, संस्थेचे कुलगुरू डॉ. एस. पाल या वेळी उपस्थित होते.
‘देशासाठीचे तंत्रज्ञान आणि सुरक्षितता याबाबतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘डीआयएटी’मध्ये मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल याचा विश्वास वाटतो,’ असे सांगून र्पीकर म्हणाले, ‘‘मूलभूत विज्ञान माणसाला निसर्ग समजून घेण्यासाठी आकर्षित करते, तर उपयोजित विज्ञान आजच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करते. ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करते.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:00 am

Web Title: diat complements drdo labs says parrikar
टॅग : Manohar Parrikar
Next Stories
1 स्मार्ट सिटीतील काही प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर शहराच्या इतर भागांती
2 संरक्षणमंत्र्यांच्या भेटीविनाच शिष्टमंडळ परत
3 महाविद्यालयीन निवडणुका घेण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सूचना
Just Now!
X