News Flash

‘सीटीईटी’ उमेदवारांना डिजिटल प्रमाणपत्रे

परीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन मिळून ६ लाख ५४ हजार २९९ उमेदवारांनी पात्रता मिळवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) निकाल नुकताच जाहीर केला. परीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन मिळून ६ लाख ५४ हजार २९९ उमेदवारांनी पात्रता मिळवली आहे. सीबीएसईने यंदा गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, सुरक्षेसाठी क्यूआर कोडही समाविष्ट करण्यात आला आहे.

सीबीएसईतर्फे ३१ जानेवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांच्या गुणपत्रिका डिजिलॉकरद्वारे उपलब्ध करून दिल्या जातील. उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लॉगिन आयडी पाठवला जाईल. गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या सुरक्षेसाठी त्यावर सुरक्षेसाठी क्यूआर कोडही समाविष्ट करण्यात आला आहे. कागदविहरित प्रशासनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या मुळे आर्थिक व स्रोतांची बचत होणार असल्याचेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

‘सीबीएसई’कडून परीक्षेचा निकाल जाहीर

*  पेपर एकसाठी १६ लाख ११ हजार ४२३ उमेदवारांनी, पेपर दोनसाठी १४ लाख ४७ हजार ५५१ उमेदवारांनी नोंदणी केली होती.

* प्रत्यक्ष परीक्षेत पेपर एकसाठी १२ लाख ४७ हजार २१७ उमेदवार, पेपर दोनसाठी ११ लाख ४ हजार ४५४ उमेदवार उपस्थित राहिले.

* ४ लाख १४ हजार ७९८ उमेदवारांनी पेपर एकमध्ये आणि पेपर दोनमध्ये २ लाख ३९ हजार ५०१ उमेदवारांनी पात्रता प्राप्त केल्याची माहिती सीबीएसईकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:20 am

Web Title: digital certificates to ctet candidates abn 97
Next Stories
1 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ६८८ करोनाबाधित वाढले, पाच रुग्णांचा मृत्यू
2 पुणे : पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातील प्रश्न ऐकून आयुक्त हसत हसत पत्रकार परिषद सोडून निघून गेले
3 पुण्यात म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून गोळीबार; एकाची हत्या
Just Now!
X