शारीरिकदृष्टय़ा अपंग पुरुषांपैकी ५५.६ टक्के पुरुषांनी आयटी क्षेत्राची पाश्र्वभूमी असलेल्या जोडीदाराला पहिली पसंती दिली तर ३३.३ टक्के शारीरिकदृष्टय़ा अपंग मुलींनी बँकिंग क्षेत्रातील मुलगा जोडीदार हवा असल्याचे सांगितले. याशिवाय मार्केटिंग आणि विक्री क्षेत्रातील व्यावसायिकांना पुण्यातील वधू-वरांनी सर्वाधीक पसंती दिली. भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांच्या संदर्भात शादी डॉट कॉम या वधू-वर विषयक संकेतस्थळाच्या वतीने पुण्यातील शारीरिकदृष्टय़ा अपंग पुरुषांच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले.
जोडीदाराच्या शोधाच्या संदर्भात ३१.१ टक्के विवाहेच्छुक शारीरिकदृष्टय़ा अपंग व्यक्तींनी आपली माहिती स्वत:हून या संकेतस्थळावर तसेच ६८.९ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांची माहिती अपलोड केली आहे. आहारविषयक सवयींमध्येदेखील स्त्रिया व पुरुष दोघांनीही आपला जोडीदार मांसाहारी हवा असल्याचेदेखील या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
शारीरिकदृष्टय़ा अपंग व्यक्तींच्या करीअरविषयक आकांक्षा आणि जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा या अन्य सामान्य व्यक्तींच्या इच्छा-आकांक्षापेक्षा भिन्न नसल्याचे पाहून शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यवाहक अधिकारी गौरव रक्षित यांनी आनंद व्यक्त केला.