शास्त्रज्ञांच्या गटाचे महत्त्वपूर्ण संशोधन

पुणे : ब्रह्मांड निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील वर्तुकाळाकार आकाशगंगेचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ब्रह्मांडाचे वय अंदाजे १५० कोटी वर्षे असतानाच्या काळातील ही आकाशगंगा असून, या संशोधनामुळे आकाशगंगांविषयीच्या प्रस्थापित संकल्पनांना आव्हान मिळाले आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आर्थर वुल्फ यांच्या नावावरून या आकाशगंगेचे नामकरण ‘वुल्फ डिस्क’ असे करण्यात आले आहे.

आकाशगंगेच्या शोधाविषयीचे संशोधन ‘नेचर’ या संशोधन पत्रिके मध्ये मेच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. संशोधक गटामध्ये पुण्याच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी के ंद्रातील (एनसीआरए) प्रा. नि:सीम काणेकर, जर्मनीतील मॅक्सप्लॅन्क इन्स्टिटय़ूटचे प्रा. मार्सल निलमन, अमेरिके तील कॅ लिफोर्निया विद्यापीठातील प्रा. झेव्हियर प्रोचास्का, प्रा. मार्क रेफलस्की यांचा समावेश आहे. चिली येथील अ‍ॅटकामा मिलिमीटर अ‍ॅरे (अल्मा) या दुर्बिणीसह कार्ल जान्स्की व्हेरी लार्ज अ‍ॅरे आणि हबल स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणींचाही वापर करण्यात आला.

आतापर्यंत शोधल्या गेलेल्या आकाशगंगांमधील वुल्फ डिस्क  ही सर्वात जुनी आकाशगंगा आहे. या आकाशगंगेत ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग अन्य आकाशगंगांच्या तुलनेत दहा पटीने जास्त आहे. अनेक आकाशगंगांचे संशोधन ताऱ्याच्या प्रकाशस्रोतापासून के ले जाते. मात्र

वुल्फ डिस्क क्वेसारच्या माध्यमातून शोधली गेली आहे, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. तसेच आतापर्यंतच्या शोधांमधून आकाशगंगा, छोटय़ा छोटय़ा आकाशगंगा एकमेकांमध्ये मिसळून तयार झालेल्या असतात असे आढळते.

मात्र, त्या वेळी ब्रह्मांडाचे वय अंदाजे सहाशे ते एक हजार कोटी वर्षे असावे. मात्र, वुल्फ डिस्क ही ब्रह्मांडाचे वय १५० कोटी वर्षे असताना शोधली गेली त्याचे कु तूहल आहे. ते आता अभ्यासले जाणार आहे, अशी माहिती संशोधकांनी दिली.

आतापर्यंतचे शोध अशा प्रकारच्या आकाशगंगा खूप पूर्वीपासून अस्तित्वात असू शकतात असा अंदाज वर्तवत होते. मात्र, ब्रह्मांडाच्या अवघ्या १५० कोटी वर्षे वयात अशी आकाशगंगा निर्माण झाल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

– प्रा. मार्सल निलमन, संशोधक