22 November 2019

News Flash

दाबेलीची गाडी लावण्यावरून एका व्यावसायिकाची दुसऱ्याला रॉडने मारहाण

दाबेलीची गाडी शेजारी न लावण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता

दाबेलीची गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना देहू रोड या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी देहू रोड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नागेश्वरविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचं पथकही रवाना झालं आहे. राजू गुजर असं मारहाण झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. हे दोघेही परराज्यातून आले आहेत. दोघांचाही कच्छी दाबेलीचा व्यवसाय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून राजू आणि नागेश्वरमध्ये वाद झाला. माझ्या गाडीच्या शेजारी तुझी गाडी लावायची नाही असे नागेश्वर राजूला म्हटला. मात्र मी इथेच गाडी लावणार असं उत्तर राजूने दिलं. त्यानंतर चिडलेल्या नागेश्वरने लोखंडी रॉडने राजूला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत झाला आहे. राजूच्या मांडीवर व्रण उमटले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी उशिरा गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

First Published on June 18, 2019 7:39 am

Web Title: dispute between two dabeliwalas in dehu road police case registered scj 81
Just Now!
X