‘देशांच्या तुलनेत भारतातील प्रसारमाध्यमांना अधिक स्वातंत्र्य असून ही माध्यमे सक्षम आणि मजबूत आहेत. मात्र, पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे समíपत भावनेतून काम करणारे पत्रकार आíथकदृष्टय़ा असुरक्षित आहेत,’ अशी खंत केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी व्यक्त केली.
विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नारद पत्रकारिता पुरस्कार’ वितरण सोहळ्यात नक्वी बोलत होते. यावर्षी ‘झी चोवीस तास’ चे मुख्य संपादक डॉ.उदय निरगुडकर, पत्रकार इंदूमती गणेश आणि व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांना ‘देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार’ देण्यात आला. या वेळी विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर, दिलीप कोटीभास्कर आदी उपस्थित होते.
या वेळी नक्वी म्हणाले, ‘जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात प्रसारमाध्यमांची संख्या जास्त आहे. दरवर्षी शेकडो वृत्तपत्रे सुरू होतात आणि बंद होतात. तरीही देशातील प्रसारमाध्यमे सक्षम आणि स्वतंत्र आहेत. मात्र, अलिकडच्या काळात पत्रकारितेकडे व्यावसायिक भूमिकेतूनच पाहिले जात असून कोणीही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्या शुध्दभावनेतून सुरू करत नाही. पत्रकरितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे समíपत भावनेतून काम करणाऱ्या पत्रकारांची आíथक स्थिती आजही मजबूत झालेली नाही. पत्रकार हे असंघटित असून त्यांची आíथक स्थिती बदलायला हवी. देशात सत्तापालट झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत. वर्षभरात आमच्या सरकारने गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. यापुढे सजगतेने काम करण्यासाठी माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.’