पुणे : शहराच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन मुळशी धरणातून ५ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी शहराला पुरविणे शक्य आहे का, यासंदर्भात महापालिके ने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या मदतीने व्यवहार्यता, कायदेशीर बाबी, आर्थिक तरतूद आणि खर्चाचे नियोजन याचा अभ्यास करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी के ली.

मुळशी धरणातील ५ टीएमसी पाणी शहरासाठी घेता येईल का, याबाबत विचार करावा असे राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट के ले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे महापालिके तील गटनेता आबा बागुल यांनी तशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे के ली होती. त्यानुसार सौरभ राव यांनी बुधवारी बैठक घेतली. गटनेता आबा बागुल, महापालिके चे अतिरिक्त आयुक्त डॉ. कु णाल खेमनार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सौरभ राव यांनी अहवाल राज्य शासनाला पाठविण्याची सूचना के ल्याची माहिती आबा बागुल यांनी दिली.

दरम्यान, मुळशी धरणातील पाणी घेण्यासंदर्भात बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. राज्य शासनाने यापूर्वीच सुर्वे समिती स्थापन के ली आहे. या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत अंमलबजावणी करता येणार नाही. त्यामुळे तूर्त सर्वागीण अभ्यास करण्याची सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाला के ली आहे, असे राज्य जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी स्पष्ट के ले.