पुणे : दिवाळीच्या सुटीत वाचनानंद देणाऱ्या दिवाळी अंकांचे यंदा पीडीएफ रूप वाचकांसमोर येत आहे. पीडीएफ दिवाळी अंकांचा नवा कल निर्माण होण्याची शक्यता असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

करोना संसर्गामुळे यंदा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळी अंकांच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या घटक असलेल्या जाहिराती मिळणे ही दिवाळी अंकांसमोरील मोठी अडचण होती. परिणामी दिवाळी अंकाची छपाई हा आव्हानात्मक भाग होता. या पार्श्वभूमीवर काहींनी प्रयोगशील विचार करत दिवाळी अंकांची परंपरा सुरू ठेवण्यासाठी दिवाळी अंक पीडीएफ स्वरूपात आणला आहे. पीडीएफ स्वरूपातील दिवाळी अंक व्हॉट्स अ‍ॅप, ई मेल अशा माध्यमांतून अनेकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
issues of society
शब्द शिमगोत्सव

‘मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक दरवर्षी छापील स्वरूपात असतो. पण यंदा शाळा सुरू नसल्याने छापील अंक शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येणार नव्हता. त्यामुळे या अडचणीवर मात करून दिवाळी अंकाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी यंदा पीडीएफ आणि दृकश्राव्य स्वरूपात दिवाळी अंक केला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना तो सहजपणे वाचता, अनुभवता येईल. यंदा नेतृत्वगुण, उत्तम आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता प्रेम इ. अभ्यास आणि यशाव्यतिरिक्त बारा गुणांच्या संकल्पनेवर मान्यवर लेखकांच्या कथा, कविता, लेखांचा दिवाळी अंकात समावेश आहे. तसेच या साहित्याचे लेखकांनीच वाचनही केले आहे. करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पीडीएफ किंवा ई-दिवाळी अंकाचा केलेला प्रयोग येत्या काळात कल म्हणून विकसित होऊ शकेल,’ असे ‘मनशक्ती’ दिवाळी अंकाच्या संपादक डॉ. वर्षां तोडमल यांनी सांगितले.

कोथरूडमधील साम्राज्य सोसायटीने ‘साम्राज्य ई अंक २०२०’ प्रसिद्ध केला आहे. ‘सोसायटीत वर्षभर कार्यक्रम होत असतात. पण यंदा संसर्गामुळे कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यामुळे काहीतरी उपक्रम करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच सोसायटीचा दिवाळी अंक करण्याचे ठरवले. अंकासाठी ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, गौरी बर्गी आणि मी मिळून अंकाच्या संपादनाचे काम केले. मुखपृष्ठपासून कथा, कविता असे लेखनही सोसायटीतील सदस्यांनीच केले. दोन कथा श्राव्य स्वरूपातही आहेत. हा अंक पीडीएफ आणि ब्लॉग स्वरूपात उपलब्ध केला आहे. आता सोसायटीतील काही सदस्यांकडून दिवाळी अंक मुद्रित करण्याची मागणीही होते आहे,’ असे कल्याणी कुलकर्णी म्हणाल्या.

मेहता मराठी ग्रंथजगतचा छापील अंक आहेच. पण त्याशिवाय यंदा ई बुक आणि पीडीएफ स्वरूपात मोफत देतो आहोत. पीडीएफ स्वरूपातील अंकाचा येत्या काळात वेगळा कल निर्माण होऊ शकतो. त्याद्वारे बंद पडलेली नियतकालिके, दिवाळी अंक यांना ऊर्जितावस्था मिळू शकेल.

— सुनील मेहता, मेहता पब्लिशिंग हाउस