ज्ञानप्रबोधिनी शाळेने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून प्रवेश प्रक्रिया केल्याचे सिद्ध झाले असून न्यायालयाने शाळेच्या विरुद्ध निकाल दिला आहे. मात्र, यावर्षीची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येणार नाही.
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रवेश परीक्षा किंवा मुलाखती घेण्यास परवानगी नाही. मात्र, ज्ञानप्रबोधिनीने पाचवीची प्रवेश प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली. त्याविषयी सामाजिक संस्थांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने ज्ञानप्रबोधिनीच्या विरोधात निकाल दिला आहे. शाळेने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन यावर्षीचे प्रवेश रद्द करण्यात आलेले नाहीत. पुढील वर्षीपासून प्रवेश परीक्षा न घेण्याची सूचना शाळेला देण्यात आली आहे.