15 October 2019

News Flash

स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे स्वीकारू नका – विद्यापीठाची सूचना

शासनाने स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे स्वीकारण्यास परवानगी दिल्यामुळे ‘आम्हालाच वेगळा नियम का,’...

Ganesh visarjan : पुणे विद्यापीठाकडून अनंत चतुर्दशीपूर्वी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसाठी एक आदेश जारी करण्यात आला होता.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील शिक्षक भरती आणि त्यानंतर शिक्षक मान्यता हा कायमच वादात अडकणारा विषय! शिक्षकांची प्रमाणपत्रे, त्यांची पात्रता यांवरून सातत्याने वाद होत असताना आता सावधगिरीची भूमिका घेत विद्यापीठाने स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे न स्वीकारण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. मात्र, त्याचवेळी शासनाने स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे स्वीकारण्यास परवानगी दिल्यामुळे ‘आम्हालाच वेगळा नियम का,’ असा प्रश्न विद्यापीठातील शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.
एखाद्या नोकरीसाठी, कामासाठी प्रमाणपत्र सादर करताना ते अधिकारी पदावरील व्यक्तीकडून साक्षांकित करून घेणे अपेक्षित असते. जेणेकरून संबंधित यंत्रणेला आलेल्या उमेदावाराच्या पात्रतेबाबत खातरजमा होणे शक्य आहे. मात्र, महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मान्यता प्रक्रियेमध्ये सध्या स्वसाक्षांकित कागदपत्रे स्वीकारली जात आहेत. स्वसाक्षांकित कागदपत्रे म्हणजे उमेदवारानेच कागदपत्रांवर स्वाक्षरी करून त्याच्या सत्यतेची हमी घेणे. असे असतानाही पात्रतेची खोटी प्रमाणपत्रे, निकष पूर्ण करत नसतानाही नियुक्तया असे प्रकार महाविद्यालयांमध्ये घडत असल्याचे समोर आले. शिक्षकांच्या मान्यतेच्या प्रस्तावाबरोबर शैक्षणिक आर्हता, अनुभव यांच्या छायांकित प्रती या स्वसाक्षांकित असल्याचे समोर आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर आता मान्यतेच्या प्रस्तावाबरोबर शिक्षकांची स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. मात्र, त्याबाबत शिक्षकांमध्ये नाराजी असल्यामुळे आता पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाने मात्र सर्व प्रक्रियेमध्ये स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबतचा शासन आदेशही आहे. असे असतानाही अधिकारी पदावरील व्यक्तीकडून कागदपत्रे साक्षांकित करून घेण्याच्या विद्यापीठाच्या नियमावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत एका शिक्षकांनी सांगितले, ‘प्राचार्याकडून कागदपत्रे साक्षांकित करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे मुळातच रखडलेल्या मान्यतेच्या प्रक्रियेला अधिकच वेळ लागेल. त्याचप्रमाणे हे शिक्षकांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. स्वसाक्षांकित कागदपत्रे स्वीकारण्यासाठी शासनानेच परवानगी दिलेली असताना विद्यापीठाने विरोधी भूमिका घेतली आहे.’

First Published on November 5, 2015 3:20 am

Web Title: do not accept self attested certificates university