News Flash

गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक देऊ नका

वाकड पोलीस ठाण्याच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले.

वाकड पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.

गृहखात्याला पालकमंत्री गिरिश बापट यांच्या कानपिचक्या
पोलीस ठाण्यात गुन्हेगार रुबाबात येतात आणि ‘मोठा साहेब’ आल्याप्रमाणे पोलीस अधिकारी उभे राहून त्याचे अदबीने स्वागत करतात, हे चित्रच चुकीचे आहे, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत पोलिसांकडून गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक मिळता कामा नये. त्यांना गुन्हेगाराप्रमाणेच वागवा, तुरूंग किंवा पोलीस कोठडी हेच त्यांचे स्थान असले पाहिजे, असे स्पष्ट मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वाकडला व्यक्त केले.
वाकड पोलीस ठाण्याच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, शशिकांत शिंदे, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘गुन्हेगारी ही समाजाला लागलेली कीड आहे. गुन्हेगारांचे जाळे मोडून काढले पाहिजे, त्यासाठी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. पोलिसांना शिव्या देणे सोपे आहे,मात्र त्यांच्यासारखे काम करणे अवघड आहे. पोलिसांची विशिष्ट अशी प्रतिमा असल्याने सामान्य नागरिकांना पोलिसांची भीती वाटते. ती बदलण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. पोलीस शब्द बदलून दुसऱ्या शब्दाचा वापर करण्याची वेळ आली आहे. एखादी व्यक्ती चौकीत दिसल्यास काहीतरी ‘भानगड’ असल्याची शंका घेतली जाते, हे नागरिकांच्या मनातून काढून टाकले पाहिजे. पोलिसांचा गुन्हेगारांवर दरारा असला पाहिजे. सराईत गुन्हेगार पोलीस चौकीत येतात, तितका सामान्य माणूस येत नाही. गुन्हेगार सर्वच बाबतीत अद्ययावत आहेत; पोलीस मात्र नाहीत. पोलीस यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे. पोलिसांवर विश्वास असला पाहिजे, त्यादृष्टीने पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे.’’ बारणे म्हणाले, ‘‘शहरात गुन्हेगारी वाढली असून पोलिसांची जरब हवी. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ नको. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये.’’

पोलीस आयुक्तालयाबाबात चर्चा करू
पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची गेल्या काही महिन्यांपासून नुसतीच चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनी नवीन पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन होईल, असे अपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी लवकर याबाबतची घोषणा करावी, अशी अपेक्षा भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी, सर्वाची मागणी असल्याचे सांगत लवकरच पोलीस आयुक्तालय होईल व त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्वाही या वेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 5:54 am

Web Title: do not give respect to criminals says girisa bapat
Next Stories
1 विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात
2 सार्वजनिक गणेश मंडळांसाठी घरगुतीपेक्षा कमी दराने वीज
3 जादा निकालासाठी गुणांची खिरापत?
Just Now!
X