News Flash

वैद्यकीय सेवेच्या विश्वासार्हतेसाठी डॉक्टर आणि रुग्णातील सुसंवाद गरजेचा – डॉ. के. एच. संचेती

‘वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हता वृद्धिंगत होण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात सुसंवाद गरजेचा आहे,

‘वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हता वृद्धिंगत होण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात सुसंवाद गरजेचा आहे,’ असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी व्यक्त केले.
‘कोअर इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लीगल मेडिसिन’ (सीआयआयएलएम) या संस्थेच्या टिळक रस्त्यावरील नूतन कार्यालयाचे डॉ. संचेती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक, ‘सीआयआयएलएम’चे संस्थापक डॉ. संतोष काकडे, न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. जयंत नवरंगे, जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मधुगीता सुखात्मे, प्रणाली सावंत, डॉ. भाग्यश्री काकडे, अ‍ॅड. मनोज पारवे या वेळी उपस्थित होते.
‘डॉक्टर व रुग्ण यांच्यात वाद निर्माण झाल्यावर न्याय प्रक्रियेत वेळ
व पैसा खर्च होतोच, शिवाय भयंकर मनस्ताप सहन करावा लागतो. या दोहोंमधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी व त्यांचे नाते बळकट करण्यासाठी या संस्थेचे काम उपयुक्त ठरेल,’ असेही डॉ. संचेती यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 12:15 am

Web Title: doctor and patient communication imporatnt for the faith in medical service
टॅग : Doctor
Next Stories
1 ‘वीरेंद्र तावडेचा अंनिसच्या कामाला पहिल्यापासून विरोधच होता’
2 शिधापत्रिकेवरील गहू, तांदळाची पोती दगडखाणीत
3 मान्सूनसाठी अजून आठ दिवसांची प्रतीक्षा?
Just Now!
X