News Flash

करोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही

‘आयसीएमआर’चा  निर्णय

प्रतिकात्मक छायाचित्र

‘आयसीएमआर’चा  निर्णय

पुणे : करोना संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) अनिवार्य करण्याची अट आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) शिथिल करण्यात आली आहे. परिषदेने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये  ‘प्रिस्क्रिप्शन नको’, या नव्या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे.

एखादा विशिष्ट आजार आपल्याला आहे किंवा नाही हे जाणून घेणे हा नागरिकाचा किं वा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्याला चाचणी करायची असल्यास डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट ठेवणे अनावश्यक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकाला करोना चाचणी करायची असल्यास डॉक्टरांकडे जाऊन चिठ्ठी घेण्याच्या सोपस्कारांतून सुटका झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशात १,०४९ प्रयोगशाळांना करोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 4:11 am

Web Title: doctor prescription is no longer required for a corona test zws 70
Next Stories
1 “करोनाची साथ आटोक्यात का नाही? पुण्यात चाचण्यांसाठी आता IAS अधिकारी नेमा”
2 पुण्यात आढळले ८०७ करोना रुग्ण तर पिंपरीत २७६ नवे रुग्ण
3 पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोईंच्या बदलीची जोरदार चर्चा !
Just Now!
X