28 February 2021

News Flash

पुण्यात डॉक्टरने केला तरुणीवर बलात्कार

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

गुंगीचे औषध देऊन एका डॉक्टरने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला होता. मात्र, दबावामुळे पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती.

पुण्यातील एक तरुणी उपचारांसाठी धनकवडीतील डॉक्टर उदय शहा यांच्या क्लिनिकमध्ये जायची. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गणेश विसर्जनाच्या दोन दिवसांनी पीडित मुलगी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेली. दुपारी एकच्या सुमारास ती क्लिनिकमध्ये गेली होती. डॉ. शहाने एक इंजेक्शन दिले तसेच गुंगीची गोळी दिली. यानंतर त्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाची वाच्यता केल्यास आई- वडिलांना ठार मारु अशी धमकी त्याने दिली होती. संभाजीनगरमधील श्री क्लिनिक येथील दवाखान्यात हा सर्व प्रकार घडला होता. दबावापोटी पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. शेवटी तिने धाडस दाखवले आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:50 pm

Web Title: doctor rape on girl in pune dhankawadi
Next Stories
1 ‘रेडीरेकनर’मध्ये घट करण्याची तरतूद
2 शहरातील हिरवाईवर घाला
3 शहरात ई-रिक्षा सुरू करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसादाअभावी खीळ!
Just Now!
X