पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची काल रात्री अचानक बदली करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ ससूनमधील डॉक्टर्स,नर्सेस आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्यने एकत्र आले आहेत. तसेच, त्यांची बदली होता कामा अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून करण्यात आली आहे. आता या प्रकरणी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांची भेट घेण्यास ससूनमधील डॉक्टर आणि मार्ड संघटनेचे सदस्य  गेले आहेत.

करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर देशभरात आढळत आहे. या आजाराचे रुग्ण पुणे जिल्ह्यात 500 रुग्णांची संख्या पार केली आहे. त्या दरम्यान आता पर्यंत 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 36 रुग्ण हे ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान दगावले आहे. यामुळे तेथील उपचारा पद्धतीवर आक्षेप घेतले जात असताना. याच ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात येत असल्याचे आदेश काल रात्री काढण्यात आला. सह अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे ससूनचा पदभार सोपवण्यात आला आहे.

तर यानंतर आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस एकत्र आल्या व   बदलीचा निर्णय मागे घ्यावा, आजपर्यंत रूग्णालयात चांगले काम केले असून या कठीण काळात असा निर्णय घेता कामा नये,  अशी भूमिका अनेकांनी मांडली. त्यानंतर या प्रकरणी काही डॉक्टरांचे शिष्ट मंडळ विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांची भेट घेण्यासाठी गेले असून ती बैठक सुरू आहे. आता या बैठकीनंतर पुढील दिशा ठरली जाणार आहे.