News Flash

मानधन वाढीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन

आयुक्तांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही मानधनात वाढ न केल्याने आंदोलनाचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या, डॉक्टरांनी मानधनात वाढ व्हावी म्हणून आंदोलन केले. संबंधित रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर समान काम समान वेतनचा नारा देत डॉक्टरांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दोन वर्षांचा ट्रेनिंग (सीपीएस) कोर्स असून यासाठी डॉक्टरांना २४ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता संबंधित ट्रेनी डॉक्टरांचे मानधन वाढवावे, यासाठी आज रुग्णालयासमोर डॉक्टरांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांची पगारवाढ केलेली आहे. तर मुंबई महानगर पालिकेने देखील तेथील डॉक्टरांचे मानधन वाढवले आहे. मात्र, वारंवार महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्रव्यवहार करूनही मानधन वाढवण्यात येत नसल्याने, आज संबंधित डॉक्टरांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 3:27 pm

Web Title: doctors of yashwantrao chavan memorial hospital done movement for increase in honorarium msr 87 kjp 91
Next Stories
1 आठ तास ‘पीपीई’ कीट घालून उपचार करत, लहान मुलांना करोनामुक्त करणारी ‘हिरकणी’
2 गुन्हेगाराचे स्वागत करणे पडले महागात;पोलीस कर्मचारी निलंबित
3 दातृत्व : वीटभट्टीवर काम करणार्‍या तरुणीकडून गरजू नागरिकांना मास्क, अन्नधान्य वाटप
Just Now!
X