मध्यभागातील गर्दीच्या ठिकाणांची श्वानांकडून तपासणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभवशाली परंपरा असलेला पुण्यातील गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पोलिसांचे परिश्रम महत्त्वाचे असते. पण पोलिसांबरोबर बाँब शोधक नाशक पथकातील प्रशिक्षित श्वानदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसरात अहोरात्र गर्दी असते. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या बाँबशोधक नाशक पथकातील प्रशिक्षित श्वान तसेच पोलिसांकडून या परिसराची तपासणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून बाँबशोधक पथकातील श्वानांवर अतिरिक्त बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली. पोलिसांप्रमाणेच श्वानांनादेखील त्यांचे काम वाटून देण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या बाँबशोधक नाशक पथकाकडून आठ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाबरोबर एक श्वान असून मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळाचा मांडव, गर्दीच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. उत्सवाच्या कालावधीत सकाळी, सायंकाळी आणि मध्यरात्री देखील श्वान पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. गर्दीच्या भागातील मंडळांचे मांडव तसेच संपूर्ण परिसराची तपासणी प्रशिक्षित श्वानांकडून करण्यात येत आहे.

मध्यभागात प्रमुख मंडळे तसेच मानांच्या मंडळातील ‘श्रीं’च्या दर्शनासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात. त्यामुळे या भागातील बंदोबस्ताची विशेष जबाबदारी श्वानांवर असते. सूर्या, लिमा, तेजा, ध्रुव, टायसन, इको, विराट हे श्वान सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर प्रशिक्षक आणि बाँबशोधक पथकातील पोलिसांकडून परिसराची तपासणी करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dogs participate in ganeshotsav camp
First published on: 20-09-2018 at 03:00 IST