राज्यात तुटवडा भासत असल्याने रक्तपेढय़ांचे आवाहन

पुणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या काहीशी घटल्याने निर्बंध कमी झाले आहेत, तसेच करोना व्यतिरिक्त रुग्णांवरील उपचार, शस्त्रक्रियाही पूर्ववत झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात दररोज पुढील पाच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे, मात्र हा साठा अत्यावश्यक रक्तसाठय़ाच्या तुलनेत कमी आहे. या पार्श्वभूमीवर लशीचा पहिला किं वा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढय़ांकडून करण्यात येत आहे.

राज्यात दररोज तीन ते पाच हजार युनिट रक्तसाठा वापरला जातो आणि तेवढय़ाच रक्ताचे संकलन होते. सद्य:स्थितीत राज्यातील रक्तपेढय़ांकडे २५ हजार युनिट रक्ताचा साठा आहे. या अनुषंगाने राज्यात पाच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा दररोज उपलब्ध असतो. मात्र, दररोज किमान २० ते २५ दिवसांचा रक्तसाठा रक्तपेढय़ांकडे उपलब्ध असणे अपेक्षित आहे. राज्यातील सर्व रक्तपेढय़ांनी छोटय़ा रक्तसंकलन शिबिरांचे आयोजन करून आवश्यक रक्तसाठा राखावा, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
low response to pradhan mantri surya ghar yojana
विश्लेषण : पंतप्रधान सूर्यघर योजनेला राज्यात प्रतिसाद कमी का?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण ठाकू र म्हणाले, की संकलन केलेल्या रक्ताची साठवणूक आणि वापर ३५ दिवसांपर्यंत करणे शक्य होते. सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे.  शिबिरात संकलित होणारे रक्त सहा तासांच्या चाचण्यांनंतर वापरता येते. मोठी शिबिरे न घेता लहान लहान शिबिरे अनेक वेळा घेतल्याने पुरेसा रक्तसाठा राखणे शक्य आहे.

करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्वजण दैनंदिन नोकरी-व्यवसायात व्यग्र झाले आहेत. त्याचबरोबर लसीकरणही करून घेत आहेत. त्यामुळे रक्तसंकलनावर परिणाम होत आहे. रक्तपेढय़ांकडे दररोज पुढील किमान आठ ते १० दिवस पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे अपेक्षित असते, मात्र सध्या हे प्रमाण पाच दिवसांचे आहे. करोना महासाथ रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहेच, मात्र लस घेण्यापूर्वी किं वा लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान केल्यास रुग्णांची गैरसोय टाळणे शक्य होईल. -डॉ. अतुल कु लकर्णी, जनकल्याण रक्तपेढी