20 March 2018

News Flash

पुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा – सुनील देवधर

देवधर यांची कम्युनिस्ट पक्षावर टीका

पुणे | Updated: March 12, 2018 5:45 PM

पुण्यातील वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सुनील देवधर.

पुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा अशी खोचक टीका भाजपचे त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी आज कम्युनिस्ट पक्षावर केली आहे. ते आज पुण्यात आयोजित, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. त्रिपुरात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयात सुनील देवधर यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा पाडण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात मुर्ती आणि पुतळ्यांच्या विटंबनाचं सत्र सुरु झालं. तामिळनाडूत पेरियार स्वामी, उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, औरंगाबादेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. मात्र त्रिपुरात पुतळा पाडण्याची घटना घडली त्यावेळी भाजपचे नाही तर कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते असं म्हणतं, देवधर यांनी या घटनेला कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरलं.

त्रिपुरातल्या घटनेनंतर राज्यभरात पुतळ्यांच्या विटंबनाचं सत्र सुरु झालं. पण या काळात कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्यकर्ते भाजपचा टीशर्ट घालून हिंसाचार करत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र पोलिसांच्या मदतीने या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला यश आल्याचं देवधर म्हणाले. त्रिपुरातील भाजपच्या यशामुळे कम्युनिस्ट पक्षासह अन्य काही पक्षातले नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं देवधर म्हणाले. मात्र सध्याच्या परिस्थिती ज्या घटना घडल्या आहेत त्या पाहता पुढील सहा महिने कोणालाही भाजपात प्रवेश दिला जाणार नसल्याचं देवधर यांनी स्पष्ट केलं. यानंतर इच्छुक उमेदवार किंवा कार्यकर्त्याची पूर्ण चौकशी करुनच त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल असंही देवधर म्हणाले.

आगामी काळात राज्य सरकारमार्फत तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचसोबत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक व्यक्तींना रोजगार निर्माण होईल याकडेही भाजप सरकार लक्ष देणार असल्याचं देवधर म्हणाले. त्रिपुरातील भारतीय जनता पक्षाचा विजय हा नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमुळे शक्य झाल्याचं देवधर यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या चारही सभांना त्रिपुरात उदंड प्रतिसाद मिळाला, या सभांच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांत आम्ही आमची काम जनतेपर्यंत पोहचवू शकलो. या कार्यक्रमाला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे,प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस दिगंबर दराडे आणि सुकृत करंदीकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

First Published on March 12, 2018 5:45 pm

Web Title: dont bother about statues bother about people tripura bjp in charge sunil deodhar criticize communist party
  1. Sanjay Kolhatkar
    Mar 12, 2018 at 6:01 pm
    अहो देवधर असे काय करताय ? येतो म्हणतायत तर घ्या त्यांना भराभर, जुन्या निष्ठावंतांची फार काळजी करू नका, ते कुठे जात नाहीत. त्यांच्या नशिबी पक्ष सत्तेत असो आगर नसो विजनवासच लिहिलंय! नशीब त्यांचं म्हणा आणि येतो म्हणतायत त्यांना घेऊन टाका.
    Reply