रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी २१ दिवसांवर; मृत्युदर २.४० टक्क्यांवर

पुणे : शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी २१.३३ दिवसांवर आला आहे. तर मृत्युदर २.४० टक्क्यांपर्यंत खाली आहे. पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीने जाहीर के लेल्या आकडेवारीतून ही बाब पुढे आली आहे. एका बाजूला करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना घटलेला मृत्युदर आणि रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वाढलेला कालावधी ही बाब काहीशी दिलासा देणारी आहे.

शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सक्रिय बाधितांची संख्याही मोठी असून ऑगस्ट अखेपर्यंत शहरात एकूण दोन लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण असतील, असा अंदाज महापालिका आणि स्मार्ट सिटीने यापूर्वी वर्तविला आहे. शहरातील करोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १९ दिवस असा होता. तर सक्रिय बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १७ दिवस असा होता. मात्र आता हा कालावधी वाढला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २१.३३ दिवसांपर्यंत पोहोचला आहे, असा निष्कर्ष स्मार्ट सिटीने त्यांच्या अहवालाद्वारे मांडला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असताना आणि मृत्युदर २.४० टक्क्यांवर आला असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणाची टक्के वारी ५८.२६ अशी असल्याचे निरीक्षण महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या डॅशबोर्डवर नोंदविण्यात आले आहे.

महापालिके ने शहरातील चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

निकटच्या संपर्कामुळे ८१.२० टक्के  रुग्ण बाधित

करोनाचा संसर्ग होण्याचा सर्वात महत्त्वाचे कारण हे निकटच्या व्यक्तींचा (फर्स्ट कॉन्टॅक्ट) संपर्क आहे. निकटच्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे ८१.२० टक्के  रुग्ण बाधित झाल्याची आकडेवारी स्मार्ट सिटी आणि महापलिके कडून जाहीर करण्यात आली आहे. करोनाची काही लक्षणे आढळल्यामुळे आणि शंका आल्यामुळे स्वत:हून तपासणी के ल्यानंतर करोना निदान झाल्याची टक्के वारी ११.६० अशी आहे. मोबाइल अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून ३.९७ टक्के , घरोघरी जाऊन के लेल्या सर्वेक्षणातून १.२३ टक्के  करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेतून संसर्ग होण्याचे प्रमाण ०.७४ टक्के , महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संसर्ग पसरण्याचे प्रमाण ०.६ असे आहे. परदेशातून परतलेल्या के वळ ०.१० टक्के  नागरिकांना करोनाचे निदान झाले आहे तर फ्लू क्लिनिकच्या माध्यमातून ०.४६ टक्के  रुग्णांचे निदान झाले आहे.