01 October 2020

News Flash

Coronavirus : रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर

महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सक्रिय बाधित रुग्णांची टक्केवारी २३. ९७ एवढी आहे

पुणे : करोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर पोहोचला आहे. ७ ऑगस्टपर्यंत ३२ दिवसांवर असलेला रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ३५ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होत असतानाच रुग्ण बरे होण्याची टक्के वारीही ७३.७० एवढी झाली आहे. घटत असलेला मृत्युदर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वाढलेला कालावधी लक्षात घेता पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीने के लेल्या अहवालामध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढल्याचे जाहीर करण्यात आले आहे. करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिके ने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सक्रिय बाधित रुग्णांची टक्केवारी २३. ९७ एवढी आहे. तर करोना संसर्गावर उपचार करून बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी ७३.७० आहे. मृत्युदर २.३३ टक्क्य़ांवर आहे. दरम्यान, जुलै  महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १७ दिवसांवर होता. तो जुलै अखेरीस २२ दिवसांवर आला होता. ७ ऑगस्टपर्यंत त्यामध्ये वाढ होऊन रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ३२ दिवसांवर पोहोचला होता. त्यामध्ये आता आणखी वाढ होऊन तो ३५ दिवसांवर पोहोचल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ऑगस्ट महिन्याअखेपर्यंत आणखी वाढेल, असा अंदाज आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटलेला मृत्युदर, बाधित रुग्णांचे बरे होण्याचे लक्षणीय प्रमाण आणि रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वाढलेला कालावधी यामुळे दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 1:13 am

Web Title: doubling time of coronavirus cases in pune improves to 35 days zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 दरमहा स्वचाचणीद्वारे नियोजनात बदल करा!
2 बंदी धुडकावून पर्यटकांची झुंबड
3 महाबळेश्वरला पाऊस कमी; चेरापुंजीची पुन्हा देशात आघाडी
Just Now!
X