17 February 2020

News Flash

घटनाकारांचे दुर्मीळ छायाचित्र शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात

२२ डिसेंबर १९५२ रोजी डॉ. आंबेडकर यांचे व्याख्यान पुणे बार असोसिएशनकडून आयोजित करण्यात आले होते.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्राचे अनावरण शनिवारी मुख्य न्यायाधीशांच्या कक्षात  करण्यात येणार आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी त्यांच्या दुर्मीळ छायाचित्राची प्रतिमा  मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या कक्षात बसविण्यात येणार आहे. २२ डिसेंबर १९५२ रोजी डॉ. आंबेडकर यांचे व्याख्यान पुणे बार असोसिएशनकडून आयोजित करण्यात आले होते. घटनेची निर्मिती केल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचे पहिलेच जाहीर व्याख्यान होते. त्या वेळी डॉ. आंबेडकर यांनी पुण्यातील वकिलांना ‘कन्डिशन्स प्रेसिडंट फॉर द सक्सेसफुल वर्किंग ऑफ डेमोक्रसी ’ या विषयावर मार्गदर्शन केले होते.

या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते विधी वाचनालयाचे उद्घाटन झाले होते. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. सी. भट, पुणे बार काउन्सिलचे चिटणीस वा. ब. गोगटे, माई आंबेडकर याप्रसंगी उपस्थित होते. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्य न्यायाधीश मोडक यांच्या कक्षात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विधी आयोगाचे माजी सदस्य अ‍ॅड. विजय  सावंत आणि पुणे बार असोसिएशनचे अ‍ॅड. सुभाष पवार यांनी दिली.

First Published on April 14, 2018 2:21 am

Web Title: dr babasaheb ambedkar rare photographs
Next Stories
1 बंगालच्या उपसागरातील ३२ किलोमीटरचे अंतर पार करण्याचा विश्वविक्रम
2 अतिक्रमणांवर संथगतीने कारवाई?
3 पोलिसांची जॅमर कारवाई टाळण्यासाठी चाकच काढले!
Just Now!
X