News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी म्हटली महाबुद्धवंदना

देहूरोड येथील वातावरण झाले होते बुद्धमय

पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड येथे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळपास एक लाख अनुयायांनी आज महाबुद्धवंदना म्हटली. येथील भव्य अशा पटांगणात असंख्य अनुयायी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून रांगेत बसलेले होते. त्यामुळे देहूरोड येथील वातावरण बुद्धमय झाले होते.

२५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या ऐतिहासीक दिवसाला आज ६५ वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त जवळपास एक लाख अनुयायीनी महाबुद्धवंदना म्हटली.

या ठिकाणी, शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या धम्मभूमीवर जवळपास एक लाख अनुयायांच्या साक्षीने व शंभर भंतेजींच्या उपस्थितीत धम्म वंदनेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 6:10 pm

Web Title: dr babasaheb ambedkars followers say mahabuddha vandana msr 87
Next Stories
1 ‘मुळशी पॅटर्न’ नंतर ‘पिंपरी-चिंचवड पॅटर्न’, पोलिसांनी काढली सराईत गुन्हेगारांची धिंड
2 पुण्यात बारमध्ये बिल देण्यावरुन वाद; बाऊन्सरने केला हवेत गोळीबार
3 पिंपरी-चिंचवड: भरदिवसा ५० तोळे सोन्याचे दागिने लुटले
Just Now!
X