बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना शनिवारी रात्री छातीत दुखू लागल्यामुळे रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय संचालक डॉ. सुजाता मलिक म्हणाल्या, ‘‘शनिवारी रात्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठीक आहे.’’ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट आणि डॉ. चंद्रशेखर मखळे पाटील त्यांच्यावर उपचार करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 2:52 am