News Flash

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : हमीद दाभोलकर

दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात आठ संशयितना अटक करण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्ष होत आहेत. 2013 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यानंतर भाजप, सेना महायुतीचे म्हणजेच उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले. या दोन्ही सरकारमध्ये नेत्यांची डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे दिसून येत आहे, अशी खंत डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनाला सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता अभिवादन सभा घेण्यात आली. त्यावेळी हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे बोलत होते. यावेळी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. सुभाष वारे, मिलिंद देशमुख यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात आठ संशयितना अटक करण्यात आली आहे. परंतु हत्येच्या सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणा पोहोचू शकल्या नाहीत. सर्वच न्यायालयाने वेळोवेळी तपास यंत्रणांना जाब विचारत असल्याने तपास पुढे जात आहे, असे यावेळी हमीद आणि मुक्ता दाभोलकर यावेळी म्हणाले. दरम्यान, ही समाधानाची बाब आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तपास यंत्रणांनी दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात या हत्येमागे कोणत्या संघटना, कोणते विचार याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. असे असताना केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी मुख्य सूत्रधाराना अटक केली जात नाही, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. संशयितांना अटक केल्यानंतरही कर्नाटकमध्ये कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. त्यामुळे विवेकवाद्यांची हत्या करण्यासाठी एक साखळी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 12:09 pm

Web Title: dr dabholkar murder case hamid dabholkar mukta dabholkar criticize government pune jud 87
Next Stories
1 पुणे: ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी एकवटले; केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दीर्घकालीन संपावर
2 भाजपच्या शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ
3 राज्यातील १७.१ टक्के अपंग विद्यार्थी शाळाबाह्य़
Just Now!
X