News Flash

ज्येष्ठ नाटय़समीक्षक, लेखिका डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन

मनीषा दीक्षित यांचा जन्म अमरावतीत झाला.

ज्येष्ठ नाटय़समीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित (वय ७१) यांचे शनिवारी पहाटे चार वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई सुषमा भट, पती उपेंद्र दीक्षित, मुलगा हृषिकेश आणि मुलगी विभावरी देशपांडे असा परिवार आहे.

मनीषा दीक्षित यांचा जन्म अमरावतीत झाला. संस्कृत भाषा आणि साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक कै. गो. के. भट यांच्या त्या कन्या होत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजरातमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. मराठी विषयात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर ‘द्वितीय महायुद्धोत्तर काव्यसमीक्षा’ या विषयामध्ये त्यांनी पीएच.डी प्राप्त केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, ललित कला केंद्र तसेच फर्गसन महाविद्यालय येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले. पुणे विद्यापीठाच्या इ.एम.आर.सी. विभागात निर्मात्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. पुण्यातील इंडियन मॅजिक आय, कलाछाया, आय.ए.पी.ए.आर तसेच अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांशी दीक्षित संबंधित होत्या.

दीक्षित यांचा नाटक, काव्य, चित्रपट, शास्त्रीय संगीत अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेल्या रुजवण, निगराणी, पूल, डायरी या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. दै. ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रांसाठी त्या नाटय़समीक्षण लिहीत असत. पुण्यातील हौशी, तरूण आणि नव्या-जुन्या रंगकर्मीसोबत त्यांचा नियमित संपर्क असायचा. नवनवीन कलात्मक उपक्रमांना त्यांचा नेहमीच पाठिंबा असे.

‘ओवी ते हायकू’ या मराठी काव्यविश्वाचा मागोवा घेणाऱ्या कार्यक्रमाचे दीक्षित यांनी लेखन केले होते. मराठी कविता आणि त्यामागील अनुभव महाराष्ट्राच्या तळागाळातील तरुणाईपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘ओवी ते हायकू’ हा कार्यक्रम दीक्षित यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:45 am

Web Title: dr manisha dikshit passed away
Next Stories
1 डी. एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
2 आक्षेपार्ह विधान करणाऱ्या छिंदमचा संबंध भाजपाशी जोडणे बालिशपणा : अमर साबळे
3 कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने पुण्यातील व्यावसायिकाची कुटुंबासह आत्महत्या
Just Now!
X