News Flash

डॉ. प्रियंका जावळे यांचा शोधप्रबंध सर्वोत्कृष्ट

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेकडून गौरव

(संग्रहित छायाचित्र)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक डॉ. प्रियंका जावळे यांच्या शोधप्रबंधाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेकडून (आयएइए) सर्वोत्कृष्ट शोधप्रबंधाचे पारितोषिक मिळाले. २४ ते २८ जून दरम्यान व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झालेल्या परिषदेत भारतातून सहभागी झालेल्या त्या एकमेव विद्यार्थी संशोधक ठरल्या.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटना ही अणुऊर्जेच्या जगभरातील नियोजनाचे आणि नियंत्रणाचे काम करते. भारतही या संस्थेचा सदस्य आहे. संघटनेच्या यंदाच्या परिषदेसाठी आण्विक अभिक्रियांमध्ये वापरण्यात आलेल्या ‘इंधनाचे व्यवस्थान – भूतकाळातील धडे, भविष्यकाळातील सक्षमता’ हा विषय होता. त्यासाठी भारतातून डॉ. प्रियंका जावळे यांची निवड झाली. परिषदेत त्यांनी ‘शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून वापरलेल्या अणू इंधनाच्या व्यवस्थापनातील सामाजिक-कायदेशीर आव्हाने’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला.

जगभरातून आलेल्या संशोधकांतून डॉ. जावळे यांचा शोधप्रबंध सवरेत्कृष्ट ठरला. या परिषदेबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अवकाश संशोधनाचे काम करणाऱ्या ‘युनाइटेड नेशन्स ऑफिस ऑफ आउटर स्पेस अफेअर्स’च्या ६२ व्या वार्षिक सत्रालाही उपस्थित राहण्याची संधी त्यांना  मिळाली.

परिषदेत डॉ. जावळे यांचा शोधप्रबंध सवरेत्कृष्ट ठरल्याने त्यांना पुढील वर्षी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणाऱ्या परिषदेसाठीही निमंत्रित करण्यात आले आहे.

आण्विक जबाबदारी (न्यूक्लिअर लाएबिलिटी) या विषयात डॉ. जावळे यांनी पीएच.डी. केली आहे. सध्या त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून अवकाश शोधकार्य संदर्भातील जागतिक व राष्ट्रीय जबाबदारी आणि अणुऊर्जेचा अवकाशातील वापरासाठीचा कायदा आणि धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.

आपल्याकडे अणुऊर्जेच्या संदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्षम धोरण, कायदा आणि नियमावलीही होण्याची गरज आहे. या परिषदेमुळे अणुऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर काय विचार होतो, हे समजून घेण्याची संधी मिळाली. संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे आनंददायी आहे.

– डॉ. प्रियंका जावळे, संशोधक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 1:48 am

Web Title: dr priyanka jawales research is the best abn 97
Next Stories
1 शहरबात पिंपरी : स्वच्छ, सुंदर शहराची कचराकुंडी
2 शहराला सहा महिने पुरेल एवढा धरणांत पाणीसाठा
3 गर्भवती महिलेवर वॉर्डबॉयकडून उपचार
Just Now!
X