महिला प्रजोत्पादन आरोग्याच्या क्षेत्रातील डॉ. राणी बंग यांच्या कार्याची दखल ‘लॅन्सेट’ या जागतिक आघाडीच्या वैद्यकीय नियतकालिकाने घेतली आहे. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांनी नुकतीच आपल्या वैवाहिक जीवनाची ४३ वर्षे पूर्ण के ली असून यापैकी सर्वाधिक काळ त्यांनी महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम भागातील लोकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात व्यतीत के ला, अशा शब्दांत ‘लॅन्सेट’ने डॉ. बंग दांपत्याच्या कामाचा सन्मान केला आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

६९ वर्षांच्या डॉ. राणी बंग यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील किशोरवयीन मुले आणि मुलींसाठी लैंगिक शिक्षण देण्यात आपले आयुष्य खर्ची घातले. करोना महासाथीमुळे ही सत्रे ऑनलाइन माध्यमातून करण्यास त्यांनी सुरुवात के ली. त्यामुळे हा एक नवीन अनुभव म्हणून डॉ. राणी बंग त्याकडे पाहत आहेत.

डॉ. राणी बंग या १५ फेब्रुवारीपासून तीन दिवस ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी लैंगिक शिक्षणाविषयी संवाद साधणार आहेत.

डॉ. राणी बंग म्हणाल्या, अनेक वर्षे मी किशोरवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शिक्षणासाठी सत्रे घेत आहे. ऑनलाइन सत्रे हा माझ्यासाठीही एक वेगळा अनुभव आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या मागणीप्रमाणे लैंगिक शिक्षण सत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीचे संकलन त्यांनी पुस्तकात केले आहे. १८ ते २६ वर्षीय विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रेम, मोह, बेजबाबदार लैंगिक वर्तन, त्यातील समस्या, व्यसनाधीनता या विषयांवर मार्गदर्शन करायचे तर तीन दिवस हा कालावधी अत्यंत कमी आहे.

लैंगिक शिक्षण विषयक सत्रामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये मुलींकडून मासिक पाळीसंबंधी तर मुलांकडून हस्तमैथुनासंबंधी प्रश्न विचारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विवाहपूर्व लैंगिक संबंध, त्यातून होणारी गर्भधारणा याबाबत मौन बाळगण्याची संस्कृती आहे,  असे सांगून डॉ. राणी बंग म्हणाल्या, गर्भपाताच्या गोळ्यांची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब आहे. मुले ती मुलींना देतात, अनेकदा डॉक्टरांच्या सल्लामसलतीशिवाय त्या घेतल्या जातात. आपत्कालीन गर्भनिरोधकाची जाहिरात मोठय़ा प्रमाणावर के ली जाते, त्याचा वापर विवाहित आणि अविवाहितांमध्येही वाढला आहे. त्याचे गंभीर दुष्परिणामही आहेत. मुलींमध्ये अमली पदार्थ, दारू आणि धूम्रपान यांचा वापर वाढला आहे, तीही अत्यंत धोकादायक बाब आहे.

कामाचा गौरव.. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे प्रणेते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी ‘सोसायटी फॉर एज्युके शन, अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ – सर्च’ या संस्थेची स्थापना के ली. किशोरवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शिक्षणासाठी त्यांनी के लेले काम हा भारतासह जगातील इतर देशांसाठी आदर्श आहे, असे ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे.

लैंगिक शिक्षण हे केवळ जननेंद्रियांच्या पुरते

मर्यादित नाही. लैंगिकता, महिला आणि पुरुषांच्या लैंगिकतेतील फरक, लैंगिकतेचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार आणि अभ्यास होण्याची गरज आहे.

– डॉ. राणी बंग