News Flash

निर्मला गोगटे, डॉ. रेवा नातू यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

दोन वर्षांच्या पुरस्कारांची पुणे महापालिके कडून घोषणा

निर्मला गोगटे व डॉ. रेवा नातू

दोन वर्षांच्या पुरस्कारांची पुणे महापालिके कडून घोषणा

पुणे : पुणे महापालिके तर्फे  देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि गायिका डॉ. रेवा नातू यांना जाहीर झाला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी पुरस्कार वितरण होऊ न शकल्याने २०२० आणि २०२१ या दोन वर्षांचे पुरस्कार एकत्रित घोषित करण्यात आले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या पुरस्कारांची घोषणा के ली. उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आदी या वेळी उपस्थित होते. २०२०च्या पुरस्कारांमध्ये मुख्य पुरस्कार निर्मला गोगटे यांना प्रदान करण्यात येईल. तर लेखन दिग्दर्शनासाठी किरण यज्ञोपवीत, नाटय़ व्यवस्थापनासाठी प्रवीण बर्वे, रंगमंच व्यवस्थापनासाठी संदीप देशमुख, संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी ज्येष्ठ कलावंत रवींद्र कुलकर्णी, बालगंधर्वाची नव्या पिढीला आठवण करून देण्याच्या कार्यासाठी अनुराधा राजहंस यांना गौरवण्यात येणार आहे.

२०२१च्या पुरस्कारांमध्ये शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी डॉ. रेवा नातू यांना मुख्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर व्हायोलिनवादक रमा चोभे, नाटय़ व्यवस्थापनासाठी समीर हंपी, बहुआयामी नाटय़कर्मी प्रसाद वनारसे, रंगमंच व्यवस्थापनासाठी गणेश माळवदकर, लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजनाकार आणि बॉक्स थिएटरच्या निर्मितीसाठी प्रदीप वैद्य यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

करोना परिस्थितीचा आढावा घेऊन बालगंधर्व पुरस्काराचा वितरण सोहळा १५ जुलै रोजी आयोजित करण्याचा मानस असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

बालगंधर्वाच्या नावाचा पुरस्कार मिळणे अतिशय आनंदाचे आणि भाग्याचे आहे. स्त्रिया नाटकात काम करत नसल्याच्या काळापासून मी माझ्या परीने जिद्दीने रंगभूमीवर काम करण्याचा प्रयत्न के ला. छोटा गंधर्व, प्रसाद सावकार, राम मराठे, दाजी भाटवडेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. रसिकांनीही मला खूप प्रोत्साहन दिले, कौतुक के ले. त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय या सर्वाचेच आहे.   

– निर्मला गोगटे

महापालिके चा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. गुरुजी आणि कु टुंबीयांचा हा आशीर्वाद आहे. या पुरस्कारामुळे आता जबाबदारी वाढली आहे आणि येत्या काळात आणखी मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.    – डॉ. रेवा नातू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 3:40 am

Web Title: dr rewa natu nirmala gogte wins balgandharva award for 2020 zws 70
Next Stories
1 शालेय पोषण आहाराचे सामाजिक लेखापरीक्षण
2 करोनाकाळात रोजगार मिळणाऱ्यांच्या संख्येत घट
3 महावितरणकडे ग्रामीणची आघाडी
Just Now!
X