News Flash

घुमान संमेलन अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे यांचा अर्ज

घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचे नाव

| September 15, 2014 05:41 am

घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाला. संत नामदेवांच्या कर्मभूमीत एप्रिलमध्ये हे संमेलन होणार आहे.
मोरे यांच्यासाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणारे ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोरे यांचे नाव सुचविले आहे. या अर्जावर पद्मगंधा प्रकाशनचे अरूण जाखडे, कवी उद्धव कानडे, सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि निकिता मोघे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांच्याकडे सुपूर्द केला. अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 5:41 am

Web Title: dr sadanand more application for ghuman sahitya sammelan presidential election
Next Stories
1 भाजप आणि सेनेसाठी प्रत्येकी १३५ जागांचा प्रस्ताव – राजीव प्रताप रुडी
2 मित्र पक्षात कुणी किती समजूतदारपणा दाखवावा हे ज्याने त्याने ठरवावे – जावडेकर
3 फरासखाना बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत महत्त्वाची माहिती ‘एटीएस’ला मिळाली
Just Now!
X