News Flash

डॉ. सुदाम काटे यांना ‘पद्मश्री’

डॉ. काटे आजही रुग्णसेवेत अविरत कार्यरत आहेत.

डॉ. सुदाम काटे

सिकल सेल आजाराच्या संशोधनाचा गौरव

सिकल सेल अ‍ॅनिमिया आजाराच्या संशोधनामध्ये आपले आयुष्य झोकून देणारे महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ. सुदाम काटे यांच्या कार्याचा ‘पद्मश्री’ किताबाने गौरव करण्यात आला आहे.

साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी म्हणजे ११ जून १९६० रोजी हडपसर या पुण्याच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र आरोग्य मंडळाची स्थापना झाली. गेली ५८ वर्षे कार्यरत असलेल्या मंडळाने डॉ. सु. ल. उर्फ सुदाम काटे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. डॉ. दादा गुजर यांच्यासमवेत काटे धडगाव (ता. नंदुरबार) येथे गेले आणि आदिवासींच्या समस्या पाहून त्यांनी सिकल सेल विकारावर काम करण्याचा निर्णय घेतला.

सिकल सेल अ‍ॅनिमिया म्हणजे नेमका आजार कसा?, तो कोठे जास्त प्रमाणात आढळतो, या विकारावर औषधांनी मात कशी करता येईल याबाबत डॉ. काटे यांचे सातत्याने संशोधन सुरू असते.

सिकल सेल हा आनुवांशिक रक्तदोष आहे. हा आजार जनुकीय दोषांमुळे होतो. रुग्णांच्या मरणप्राय यातना पाहून गुजर आणि काटे यांनी वैद्य य. गो. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदशास्त्रातील वनस्पतींपासून औषधे तयार केली. डॉ. काटे आजही रुग्णसेवेत अविरत कार्यरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 3:10 am

Web Title: dr sudam kate gets padmashree
Next Stories
1 पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची शाळांवर सक्ती
2 ई-बस पीएमपीच्या ताफ्यात, उद्घाटन मात्र लांबणीवर
3 पुण्यात पारपत्रधारकांची वाढती संख्या
Just Now!
X