News Flash

पुण्यात अंमली पदार्थसह एका नायजेरियन नागरिकास अटक

पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह युवकाला अटक केली.

शेखर अहिरे हा संशयित अनेक दिवसांपासून फरार होता

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन युवकास पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह अटक केली. एसजीएस मॉलसमोरील मोलेदीना रोड येथे काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थासह एका नायजेरीयन व्यक्तीस अंमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे.  एसजीएस मॉल या परिसरात एक व्यक्ती कोकेन आणि मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाल्यानंतर त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मायकल औकेये क्लेम (वय-२८, रा. सध्या जुहू कोलीवाडा, अंधेरी वेस्ट, मुंबई, मूळ रा. नायजेरीया) यास अटक केली,असे पोलिसांनी सांगितले. या व्यक्तीच्या ताब्यातून १ लाख २५ हजार किमतीचे २५ ग्रॅम मेफेड्रोन, १ लाख १० हजार किमतीचे ११ ग्रॅम कोकेन, रोख ७१० रुपये आणि एक सुझूकी अक्सेस दुचाकी असा २ लाख ७५ हजाराचा माल जप्त करण्यात आला. याचा आधिकचा तपास बंडगार्डन पोलीस अधिक करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 9:20 pm

Web Title: drug peddler arrested in pune cocaine drug mefodrone drug
Next Stories
1 राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्या चौघांना जामीन
2 पुण्यात नवा फ्लॅट बघताना ९व्या मजल्यावरुन पडून महिलेचा दुर्देवी अंत
3 पुणे: गणेश चांदणेच्या कुटुंबीयांना महापालिका देणार ३ लाख रुपये
Just Now!
X