22 November 2017

News Flash

पुण्यात साडेतेरा लाखांचे अफीम पकडले, एक जण अटकेत

धनकवडी येथे संशयास्पद स्थितीत दिसला.

पुणे | Updated: September 14, 2017 11:09 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल साडेचार किलो वजनाचे साडेतरा लाख रूपये किमतीचे अफीम पकडण्यात आले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

सत्यनारायण शंकर अहिर (वय ३२, रा. गायकवाड बिल्डिंग, आंबेगाव पठरा, मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना अहिर हा धनकवडी येथील शिव कॉलनी बस स्थानकाजवळ संशयास्पद स्थितीत दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात साडेतरा लाख रूपये किमतीचे अफीम आढळले. अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून, हा अमली पदार्थ त्याने कोठून मिळविला याची तपासणी करण्यात येत आहे.

First Published on September 14, 2017 11:09 pm

Web Title: drug substance seized of rupees 13 50 lakhs from pune one arrested