सरत्या वर्षांला निरोप देताना मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांना त्यांनी केलेली मस्ती गुरुवारी मध्यरात्री चांगलीच अंगलट आली. नववर्षांच्या स्वागताला भरधाव वाहने चालवणाऱ्या मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी संध्याकाळपासूनच शहराच्या विविध भागात ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ ही विशेष मोहीम राबवली आणि या मोहिमेत ३५३ मद्यपी वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्या शिवाय १४० सहप्रवाशांवरही पोलिसांनी कारवाई केली.
नववर्षांचे स्वागत करताना भरधाव वेगाने आणि मद्य पिउन वाहने चालविणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी शहरात गुरुवारी सायंकाळपासून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चौकाचौकात पोलिसांनी खडा पहारा ठेवला होता. मद्य पिउन वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे गंभीर अपघात होतात. हा धोका लक्षात घेऊन मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दोन दिवस आधीपासूनच दिला होता. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे ८०० पोलीस कर्मचारी गुरुवारी सायंकाळापासून पहाटे पाचपर्यंत विविध रस्त्यांवर बंदाबस्तासाठी तैनात होते.
वाहतूक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारीही साध्या वेषात गर्दीच्या रस्त्यांवर गस्त घालत होते. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी महिला आधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते.
कोरेगांव पार्क येथील नॉर्थमेन रस्ता, लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, फग्र्युसन रस्ता, चांदणी चौक, पिंपरी आणि पुणे शहराच्या मध्यवस्तीत वाहतूक पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मोहीम राबविली. या कारवाईत ३५३ मद्यपी वाहनचालकांवर तसेच १४० सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी ८० ब्रीथ अॅनलायजरचा वापर केला, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. पी. शेरे यांनी दिली. दरम्यान, नववर्ष स्वागत करताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही सांगण्यात आले.

वर्षभरात पाच हजार ४५८ मद्यपी चालकांवर कारवाई
वाहतूक पोलिसांनी २०१५ या वर्षांत पाच हजार ४५८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. वर्षभरात नियमभंग करणााऱ्या तीन हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन खात्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. मद्यपी वाहनचालकांविरूद्ध वर्षभर ड्रंक अॅंण्ड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात येणार आहे.
आर. पी. शेरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!