पिंपरी-चिंचवड येथील विठ्ठलवाडी नगर मध्ये पेंटिंग काम करणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिकांना हा मृतदेह अढळून आला. मयत इसमाचे नाव सतीश घाडगे असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली असता पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

३२ वर्षीय सतीश हा विठ्ठलवाडी नगरमध्येच राहतो. सतीशला दारुचे व्यसन होते. नेहमीप्रमाणे सतीश रात्री मद्यपान करून अनेक व्यक्तींना भेटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सतीश पेंटिंगचे काम करायचा. त्याला मद्यपानाची सवय असल्याने नेहमीप्रमाणे मद्यपान करुन घरी जात असताना दारुच्या नशेत तो पुलावरून काली पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळी आठच्या सुमारास सतीशचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी यशवंत स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सतीशचा मृत्यू मद्यपानामुळे पुलावरून काली पडल्याने झाला की इतर काही कारणाने यासंदर्भात पोलिस सध्या तपास करीत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून सतीशने काल रात्री दारु प्यायली होती की नाही यासंदर्भातील माहिती समोर आल्यास पोलिसांच्या शक्यतेला बळ मिळेल. सतीश यांच्या पाठीमागे पत्नी, मुले, आई असा परिवार आहे.