20 November 2017

News Flash

दारूच्या नशेत पत्नीने पतीच्या अंगावर ओतले गरम तेल

प्रेम विवाहानंतरच्या वादाचा भडका

पुणे | Updated: July 17, 2017 3:39 PM

हाणामारीतील जखमींवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दारुच्या नशेत असलेल्या पत्नीने गाढ झोपी गेलेल्या पतीच्या अंगावर गरम तेल ओतल्याची घटना पुण्यातील वानवडी येथे घडली. या घटनेत पती १० टक्के भाजला अजून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी प्रेम विवाह केला आहे. पुणे-मुंबई-पुणे प्रवासादरम्यान दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर वयात अंतर असल्याचा कोणताही विचार न करता दोघांनी विवाह केला. विवाहानंतर पत्नी पुण्यात तर पती मुंबईमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांना एकमेकांपासून वेगळे राहावे लागत होते.

वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत अर्जुन शेरसिया (वय २६) असे भाजलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार पत्नी जया अर्जुन शेरसिया (वय ३६) राहत असलेल्या वानवडी येथील सिक्रेट हॉल टाऊनमध्ये घडला. या दोघांनीही प्रेमविवाह केला आहे. भरत हा मुंबईतील चेंबूर येथे मोबाईल विक्रीचे काम करतो. तर त्याची पत्नी जया ही पुण्यात काम करते. भरत शनिवारी पुण्यात आला होता. दोघे त्याच रात्री एकत्र बसून दारु प्यायले. या दरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघे झोपले. मात्र पत्नी जयाचा राग शांत झाला नव्हता. याच रागामुळे दारुच्या नशेत तिने पतीच्या अंगावर गरम तेल ओतले. या घटनेत भरत हा १० टक्के भाजला असून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on July 17, 2017 3:13 pm

Web Title: drunken woman poured hot oil on her husbands body in pune