01 March 2021

News Flash

पुणे विमानतळ १४ दिवसांसाठी राहणार बंद; धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु

सध्या या विमानतळावर रात्रीच्या वेळेत धावपट्टीचे काम सुरु

संग्रहित छायाचित्र

पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमानांची उड्डाणं १४ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे भारतीय हवाई दलानं रविवारी कळवलं आहे. त्यानुसार, २६ एप्रिल २०२१ ते ९ मे २०२१ या काळात विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुणे शहरातील लोहगाव येथील हवाई दलाच्या एअर बेसवरुनच व्यावसायिक विमानांचे नियंत्रण केले जाते. सध्या या विमानतळावर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. दरम्यान, रात्रीच्या सर्व प्रकारची विमान उड्डाणं आणि लँडिंगच्या सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या साधारण १० विमान सेवा या दिवसाच्या वेळेत बदलण्यात आल्या आहेत. लॉकडाउनच्या आधी पुणे विमानतळावर २,५३० मीटरची एकच धावपट्टी कार्यरत होती. यावरुन दिवसभरात साधारण १७० विमान उड्डाण होतं होती, अशी माहिती विमानतळ संचालकांनी दिली.

“१५ सप्टेंबरपासून धावपट्टीचं लोहगावपासूनचं अंतर २,१३३ मीटरनं कमी करण्यात येणार आहे. तसेच वाघोलीच्या शेवटापर्यंत २८ क्रमांकाच्या धावपट्टीचं काम पुढील ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत सर्व विमान कंपन्यांना कळवण्यात आलं असून त्यानुसार ते आपल्या उड्डाणांच्या वेळा निश्चित करणार आहेत,” अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दिली होती.

पुणे विमानतळावरुन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होतात. विशेषतः पश्चिम आशियातील देशांमध्ये इथून विमान जातात. विमानांच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होत असल्याने नव्या टर्मिनलची उभारणी करणे आणि धावपट्ट्यांमध्ये वाढ करणे गरजेचे ठरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 8:51 pm

Web Title: due to runway resurfacing works pune airport will have no flight operations for 14 days aau 85
Next Stories
1 पुण्यातील महिला पोलिसामुळे उडाली झोप; सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी लावला डोक्याला हात
2 पुण्यातील थरकाप उडवणारी घटना; ‘तुला अक्कल नाही का?’ म्हटल्यानं पोलिसावर रॉडने हल्ला
3 लाल किल्यावर झेंडा फडकवणारा मोदींचाच माणूस होता – कोळसे पाटील
Just Now!
X