हैदराबादहून मुंबईकडे जात असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसने आज (शनिवार) सकाळी सात वाजता क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूर ठार झाले आहेत.

यवतजवळील खामगाव फाटा येथे असलेल्या क्रॉसिंगवर रुळावरून जात असलेल्या या ट्रॅक्टरला दुरांतोने एक्सप्रेसने धडक दिली. यावेळी ट्रॅक्टरमधून २० ऊसतोडणी कामगार जात होते. धडकेनंतर तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर, उर्वरित जण जखमी झाले आहेत.

यापैकी काही मजुरांची पकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींवर दौंडमधील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातासाठी रेल्वे फाटकावरील रेल्वे  कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. धडकेनंतर दुरांतो एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे.