28 September 2020

News Flash

पुणे : परीक्षेसाठी द्यावा लागणार करोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट; डी. वाय. पाटील कॉलेजचा आदेश

विद्यार्थांना क्वारंटनाइन आणि करोना चाचणी सक्तीची

फोटो सौजन्य : dental.dpu.edu.in

पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजच्या एका निर्णयामुळे शेकडो विद्यार्थांना चिंतेत टाकलं आहे. कॉलेजने २४ ऑगस्ट रोजी फिजिकल परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. पण करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून विद्यार्थी यासाठी अद्याप तयार नाहीत. ९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थांना कॉलेजमध्ये येणाचा आदेश देण्यात आला आहे. त्यानंतर नियमांनुसार ९ ऑगस्टपासून दोन आठवडे विद्यार्थांना क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागेल, असा आदेश डी. वाय पाटील या कॉलेजने काढला आहे. म्हणजे वेळपत्रकानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉलेजला घेता येईल.

पुणे मिररच्या वृत्तानुसार, कॉलेजकडून विद्यार्थी पुण्यात आल्यानंतर आणि पुण्यातून बाहेर जाताना कोविड टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. देशातील विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. पुण्याबाहेरील सर्व विद्यार्थी लॉकडाउनमुळे आपापल्या घरी परतले आहेत. सध्या पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परीक्षेसाठी माघारी येण्यावर त्या विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

विद्यार्थांचं काय मत आहे ?

पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांनी राहणे, प्रवास, कोविड केअर सेंटर आणि सरकारी नियमांवर प्रश्न उपस्थित केला आहे. सर्व नियमांचं पालन करुनच परीक्षा होणार असल्याचं कॉलेजनं स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेतल्यानंतर कॉलेजचं वार्षिक नियोजन (अॅकेडमिक शेड्यूल ) व्यवस्थित राहिल, आणि भविष्यात विद्यार्थांना कोणताही त्रास होणार नाही, असेही कॉलेजचं मत आहे. डी. वाय. पाटील येथील अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थी म्हणाला की, ‘आम्ही ऑनलाइन टेस्टसाठी अनेकांना पत्र लिहली आहेत. पुण्यातील परिस्थिती तिथे जाण्यासारखी नाही. करोनाचा प्रादुर्भाव येथे दिवसागणिक वाढतच आहे.’ डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये शिकणारा हा विद्यार्थी गुरुग्राममध्ये राहतोय. लॉकडाउनमध्ये तो आपल्या घरी परतला होता. विद्यार्थी म्हणाला, ‘ पुण्यात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परीक्षा देण्यासाठी पुण्यात येणं म्हणजे जिवाला धोकाच आहे.’

युजीसीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका –
अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ठाम आहे. यूजीसीच्या या निर्णयाविरोधात युवासेनाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यावर १० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

ठाकरे सरकारला पत्र –
अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी कॉलेजच्या निर्णयानंतर परीक्षा रद्द कराव्यात, यासाठी राज्यातील ठाकरे सरकारला पत्र लिहलं आहे. या पत्रावर ६३ विद्यार्थ्यांची डिजिटल साइन आहे. या पत्रात विद्यार्थ्यांनी असं लिहलेय की, ‘पुणे करोना महामारीच केंद्र झालं आहे. अशा परिस्थितीत आम्ही पुण्यात गेल्यानंतर आमच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीतही आम्ही पुण्यात गेलो तर आम्हाला सर्व सावधगिरी बाळगावी लागेल. तरीही मनातील भिती तशीच राहणार आहे. कॉलेजकडून आम्हाला कोणतीही विक्लप किंवा नियोजन केल्याचं सांगण्यात आलं नाही. आम्ही परीक्षा देण्यासाठी आल्यानंतर एखाद्याला करोनाची बाधा झाल्यानंतर काय करावं? असेही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही.’

कॉलेज काय म्हणतेय?
डी. वाय पाटील डेंटल कॉलेजचे डीन डॉ. डी. गोपाळकृष्ण म्हणाले, ‘आम्ही कोविडचे टास्ट फोर्स तयार केलं आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना(WHO)च्या नियमांनुसार सर्व सोयी सुविधा आणि काळजी घेण्याची तयारी केली आहे. याबाबतचे सर्व ऑनलाइन व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. आम्ही सोशल डिस्टनसिंगचा (सामाजिक अंतर) वापर करुन परीक्षा घेणार आहे. तसेच सर्व विद्यार्थांना करोना चाचणी करण्यास सांगण्यात आलं आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 10:13 am

Web Title: dy patil dental students have also been told to take covid 19 tests nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘एकमेव लोकमान्य’ला वाचकांचा उदंड प्रतिसाद
2 पिंपरी-चिंचवड : कोविड सेंटरच्या कामावरून मनसेचा खळखट्याकचा इशारा
3 पुण्यात दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू ; १ हजार २९० नवे करोनाबाधित
Just Now!
X