देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये ई सिगारेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ई सिगारेटच्या वापराने पौगंडावस्थेतील मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने ई सिगारेटच्या वापरावर गेल्या वर्षी कायद्याद्वारे बंदी घातली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांच्या आवारात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरही बंदी आहे. असे असूनही अनेक विद्यार्थी सिगारेट ओढत असल्याचे, ई सिगारेटचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. या पाश्र्वभूमीवर, यूजीसीने देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना ई सिगारटेवरील बंदीची सूचना परिपत्रकाद्वारे दिली आहे. ई सिगारेटमुळे पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे अशा उत्पादनांपासून मुलांना दूर ठेवणे, त्यांना जागरूक करणे आवश्यक आहे, असे यूजीसीने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 1:06 am