पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनायलयाने १ कोटी ८३ लाखांचा दंड ठोठावला. फेमा कायद्याअंतर्गत अविनाश भोसलेंवर कारवाई करण्यात आली आहे.
अविनाश भोसले यांना २००७ साली अवैधरित्या परकीय चलन भारतात आणल्याप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यावेळी भोसले यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड आणि महागड्या परदेशी वस्तू सापडल्या होत्या. मात्र अविनाश भोसले यांनी सीमाशुल्क न भरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
अविनाश भोसले हे काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे व्याही आहेत. पतंगरावांचे पुत्र विश्वजीत आणि भोसले यांची कन्या स्वप्नाली यांचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.