पिंपरी-चिंचवडमध्ये महिल्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या उच्चशिक्षित सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा एककडून जेरबंद करण्यात आले आहे. समीर श्रीकांत नान्नजकर (४६) असं जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८ लाख ४८ हजार रुपयांचे २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून १० गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांपासून लपण्यासाठी आरोपी श्रीकांत ने स्वतः चे नाव बदलून विनायक श्रीकांत मान्नजकर असे ठेवले होते. तसं बनावट आधारकार्ड देखील तयार केले होते.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार श्रीकांत हा भोसरी येथे राहतो. तो गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतो आहे. तो पदवीधर असून अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. महिल्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तो हिसकावत असे. त्याच्यावर आर्म ऍक्ट आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, आरोपी श्रीकांत हा भोसरी येथे आहे. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाठलाग करून त्याला फिल्मीस्टाईल पकडले.

सराईत गुन्हेगार श्रीकांतला न्यायलयात हजर करून पोलीस कस्टडी घेण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, एका साथीदारासह दुचाकीवरून येऊन पायी चालणाऱ्या महिल्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असे अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, हिसकावलेले काही सोन्याचे दागिने ओळखीच्या सोनाराला आई आजारी असल्याचा बहाणा करून विकले तर काही गहाण ठेवले होते.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, रविंद्र गावंडे, आप्पा लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर, मारुती जायभाई, सचिन मोरे, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत आणि तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली आहे.