घरच्या घरी शिक्षण देण्याच्या पद्धतीला (होमस्कूलींग) सध्या व्हच्र्युअल किंवा ऑनलाइन गुरूंची साथ मिळाली आहे. शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईट्स, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या नव्या स्रोतांमुळे पालक आवर्जून मुलांना घरीच शिकवण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.. अशा प्रकारे शाळेबाबत असणाऱ्या असुरक्षितेच्या भावनेला इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक साहित्याने उत्तर दिले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी घरीच शिक्षण देण्याची संकल्पना पुन्हा रूजत आहे. पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमधील साधारण ३०० पालकांनी घरी शिक्षण देण्याच्या संकल्पनेवर आधारित असलेली संकेतस्थळे, फोरम्स येथे नोंदणी केल्याचे दिसते आहे.  
हव्या त्या विषयांचे किंवा मुलांना रस असलेल्या सर्वच विषयांचे शिक्षण मिळावे, अशा उद्देशाने घरी शिक्षण देण्याकडे पालक वळत आहेत. शाळेतील किंवा कोणत्याही बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये ठराविक विषय असतात. ठराविक विषय, प्रत्येक वर्षी त्यातील ठराविक भागांचाच अभ्यास अशी साचेबद्धता घरी शिकवण्यात टाळता येते. परीक्षेसाठी किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिक्षण या रूढ झालेल्या संकल्पना न पटल्यामुळेही मुलांना घरीच शिकवण्याचा पर्याय पालकांना योग्य वाटत आहे. राज्यपातळीवरील परीक्षा मंडळ, सीबीएससी या केंद्रीय परीक्षा मंडळानेही बाहेरून परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना दिलाच आहे. त्याचबरोबर आयजीसीएससी, आयबी, आयसीएससी यांसारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षा मंडळांच्या परीक्षाही बाहेरून देता येतात. राष्ट्रीय मुक्त विद्यालयाचा (एनआयओएस) पर्यायही उपलब्ध आहे. या सगळ्या परीक्षा मंडळांच्या अभ्यासक्रमाचे ऑनलाइन शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे निशी शहा या पालकांनी सांगितले.  
शिकवण्यासाठी शिक्षकाला सध्या प्रत्येक विषयाचे शिक्षण देणारी संकेतस्थळे, एखाद्या विषयाच्या व्याख्यानाचे व्हिडिओ, मुलांशी संवाद साधून शिक्षण देणारी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्याचा वापर पालक प्रामुख्याने करत आहेत. मुलांना या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एखादा विषय कसा शिकवायचा हे समजून घेण्यासाठीही यू-टय़ूब आणि विविध संकेस्थळांचा वापर वाढला आहे. याबाबत रिया यांनी सांगितले,  घरी शिक्षण देण्याची कारणे काय?
*पर्यायी शिक्षण साहित्य उपलब्ध आहे.
*शाळा या संकल्पनेबाबत असुरक्षितता वाटते.
*साचेबद्ध शिक्षण पटत नाही.
*वेगवेगळ्या परीक्षा मंडळे किंवा शिक्षण पद्धतींतील वेगवेगळ्या आवडलेल्या गोष्टी मुलांना एकत्र शिकवण्याची इच्छा.
*मुलांना संपूर्ण वेळ देता यावा.