28 September 2020

News Flash

अब्दुल सत्तार यांच्याबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

सरकार दमदार कामगिरी करणार असल्याचेही बोलून दाखवले

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचे आमदार व राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नाराज आहे, राजीनामा देणार आहेत. अशी चर्चा मागील दोन दिवसांपासून राज्यभर रंगली होती. अशा कोणत्याही चर्चांमध्ये तथ्य नसून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेतलेली आहे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली आहे. त्यामुळे सत्तार मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत किंवा शिवसेनाही सोडणार नाहीत, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

पुण्यातील मेट्रो कामाच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदे हे शहरात आले होते. त्यावेळी पत्रकाराशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणी किती देव पाण्यात बुडवून बसले, तरी वेगवेगळया विचारधारेचं सरकार सर्व सामन्याचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र आले आहे व हे सरकार टिकणार आहे. आम्ही दमदार कामगिरी करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शेतकर्‍यांना कर्ज माफी, १० रुपयात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. म्हणूनच भाजपच्या पोटात दुखत असल्याने, यातून सध्या वावडय़ा उठविण्याचे काम केले जात आहे. अशा शब्दात शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, पुणे मेट्रो पूर्ण क्षमतेने २०२२ साली धावणार असुन पुणेकर नागरिकांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार असल्याचे देखील यावेळी त्यांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 7:55 pm

Web Title: eknath shinde is said about abdul sattar msr 87
Next Stories
1 स्वप्न बघायचं कोणी काही कारण नाही; सरकार पाच वर्षे चालेल : वळसे पाटील
2 आमचा डीएनए विरोधी पक्षात बसण्याचा : प्रविण दरेकर
3 ‘आधार’साठी ‘माननीयां’ची पत्रे आता निरुपयोगी
Just Now!
X