News Flash

मतदानामध्ये अजूनही महिला मागेच!

पुणे शहरातील आठ मतदारसंघांमध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी ५२.३८, तर पुरुषांची टक्केवारी ५५.९६ इतकी भरली आहे.

| October 18, 2014 03:20 am

महिला विविध क्षेत्रात आघाडी घेत असल्या तरी मतदानामध्ये अजूनही तुलनेने मागेच असल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहर आणि एकूणच जिल्ह्य़ातील मतदारसंघांमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघांमध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी ५२.३८, तर पुरुषांची टक्केवारी ५५.९६ इतकी भरली आहे.
जिल्हा प्रशासनाने मतदारसंघांनुसार महिला व पुरुषांच्या मतदानाची विभागणी जाहीर केली आहे. त्यात पुणे शहरातील आठ मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्य़ातील एकूण २१ मतदारसंघांमध्ये सर्वच ठिकाणी महिलांची मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्य़ात महिला मतदारांची संख्या ३२ लाख ८२ हजार २८३ इतकी आहे. त्यापैकी १९ लाख ५३ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्य़ात ५९.५१ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात ३६ लाख ४४ हजार ७१५ पुरुष मतदार आहेत. त्यात ६३.४० टक्के मतदारांनी मतदान केले. त्यामुळे अजूनही महिला मागेच असल्याचे पाहायला मिळाले आहे.
हाच कल सातत्याने पाहायला मिळाला आहे. २००९ ची विधानसभा, २००९ ची लोकसभा, २०१४ ची लोकसभा आणि आताही महिलांची मतदानाची टक्केवारी कमी आहे. ती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात आले होते. महिला बचत गटांमार्फत महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे १६ हजार हाउसिंग सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला होता. याशिवाय घरगुती काम करणाऱ्या महिलांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला होता. या प्रयत्नांनंतरही महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली नाही.
 
‘‘जनगणनेनुसार दर हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या ९१० आहे. मतदानात हे प्रमाण ९०३ इतके आहे. हा फार मोठा फरक नसला तरी तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावरून महिलांमध्ये मतदानाबाबत अजूनही थोडीशी उदासिनता दिसते. पुढच्या निवडणुकीत यावर अधिक भर देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. त्यांची मतदानाची टक्केवारी वाढली तर निवडणुकीच्या निकालाच्या गुणवत्तेत सकारात्मक फरक पडेल.’’
– सौरभ राव, जिल्हाधिकारी, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2014 3:20 am

Web Title: election gents ladies percentage
टॅग : Election,Ladies
Next Stories
1 अडीच लाख किलो लाडू-चिवडा..! रास्त दरात उपलब्ध
2 मेट्रोवरील हरकतींची सुनावणी पालिकेत सुरू
3 निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांना बंदी
Just Now!
X