महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेत सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन तळागाळात शासनाच्या विविध योजना पोचविणारे  काँग्रेसचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार असून, राज्यात पुन्हा काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे. राज्यात विकासाच्या बाबतीत इंदापूर तालुका पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी विक्रमी मताने विजयी करा, असे आवाहन माजी सहकारमंत्री आणि इंदापूरचे काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.
त्यांच्या इंदापूर तालुक्यात गलांडवाडी, वरकुट, लोणी देवकर, डाळज सणसर या भागासाठी सभा झाली. त्यात ते बोलत होते. याशिवाय इंदापूर तालुक्यात इतरही अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या.
ते म्हणाले की, एकेकाळी दुष्काळाच्या खाईत असलेला इंदापूर तालुका सिंचन क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे आता शेतीउत्पन्नाच्या बाबतीमध्ये अग्रेसर ठरला आहे. इंदापूर तालुक्याचे वार्षकि उत्पन्न तीन हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. आगामी काळात भविष्याचा वेध घेऊन इंदापूर तालुक्याचा सर्वागीण विकास करण्याचा व तालुक्यात समृध्दी आणण्याचा प्रयत्न मी गेली वीस वष्रे करीत आहे. त्याचे दृष्य परिणाम दिसत आहेत.
इंदापूर तालुका राज्याचे शक्तिस्थळ होत असल्यामुळे तालुक्यावर राजकीय हल्ले सुरू झाले आहेत. विरोधकांनी खालची पातळी गाठली आहे. इंदापूर तालुका वेगळया विचाराचा आणि संस्कृतीचा आहे. काही घातकी लोकांनी वीस वर्ष छुपा संघर्ष केला. त्याला इंदापूर तालुक्यातील जनेतेने सडेतोड उत्तर दिले. आता तर ते आमने सामने आले आहेत, पण जनता माझ्या पाठीशी आहेतोपर्यंत कोणीही माझा पराभव करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Pratibha Dhanorkar
चंद्रपूर : बंदव्दार चर्चेत काय ठरले? आमदार प्रतिभा धानोरकरांनी घेतली नाराज विजय वडेट्टीवारांची भेट
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा