21 September 2020

News Flash

वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी विशेष मोहीम

या मोहिमेशिवाय इतर कार्यालयीन दिवशीही वीजबिलावरील नावात बदल करण्याचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

लघु व उच्चदाब वीजजोडणी असलेल्या वीजग्राहकांना वीजबिलावरील ग्राहकाच्या नावात बदल करायचा असल्यास त्यासाठी ‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात येत्या तीन महिन्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शनिवारी (२ जुल) मंडल व उपविभाग कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

पुणे परिमंडलात येत्या जुल, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी वीजबिलातील ग्राहकाच्या नावात बदल करण्याची कार्यवाही कार्यालयीन वेळेत होणार आहे. नावाद बदल करून घ्यायचा असल्यास लघुदाब वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत तसेच उच्चदाब वीजग्राहकांसाठी रास्तापेठ मंडल, गणेशिखड मंडल व पुणे ग्रामीण मंडल कार्यालयात ही विशेष मोहीम आयोजित केली जात आहे. या मोहिमेशिवाय इतर कार्यालयीन दिवशीही वीजबिलावरील नावात बदल करण्याचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पुणे परिमंडलातील ज्या वीजग्राहकांना देयकातील ग्राहक नावात बदल करायचा असेल त्यांनी संबंधित उपविभाग कार्यालय किंवा मंडल कार्यालयात योग्य कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. देयकातील ग्राहक नावात बदल करण्याचे अर्ज महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच संबंधित उपविभाग व मंडल कार्यालयांसह ग्राहक सुविधा केंद्रात उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 5:25 am

Web Title: electricity bill issue
Next Stories
1 घरात शिरलेल्या चोरटय़ाकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण व लूट
2 विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी ६० ज्ञानमंडळांची स्थापना
3 ‘पंतप्रधान रोजगार’मधून कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
Just Now!
X