News Flash

पुण्यात साडेतीन कोटींचे हस्तीदंत विक्रीसाठी आलेले चौघे अटकेत

पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाच्या परिसरात साडेतीन कोटींचे दोन हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत चंद्रकांत अष्टेकर, अमित अशोक पिसका, आदित्य संदीप

पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाच्या परिसरात साडेतीन कोटींचे दोन हस्तीदंत विक्रीसाठी आलेल्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत चंद्रकांत अष्टेकर, अमित अशोक पिसका, आदित्य संदीप खांडगे आणि ऋषीकेश हरिश्चंद्र गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड वरील पु.ल. देशपांडे उद्यान परिसरात दोन हस्ती दंत विक्रीसाठी चौघे जण येणार आहेत. अशी माहिती पोलिसांना खबर्‍यांमार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिथे सापळा रचला आणि त्या परिसरात अनिकेत चंद्रकांत अष्टेकर, अमित अशोक पिसका, आदित्य संदीप खांडगे आणि ऋषीकेश हरिश्चंद्र गायकवाड हे चौघे तिथे आल्यावर त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे साडेतीन कोटी रुपये किमतीचे दोन हस्ती दंत सापडले. या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 1:33 pm

Web Title: elephant teeth smugglers arrested by pune enquiry start by police scj 81
Next Stories
1 पुणे : सिगरेट पेटवताच सिलिंडरचा स्फोट, एक ठार, एक जखमी
2 मेट्रोच्या कामांना गती
3 पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन उपचार केंद्र
Just Now!
X